Site icon सक्रिय न्यूज

उंदरी ग्रामस्थांनी केली पुनर्वसन करण्याची मागणी……!

उंदरी ग्रामस्थांनी केली पुनर्वसन करण्याची मागणी……!
केज दि.३ – तालुक्यातील उंदरी येथील पवारवस्ती वरील धरणग्रस्त लोकांच्या जमीन व जीविताला धोका असल्याने वस्ती वाडीसाठी जमीन देत आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे.
          निवेदनात म्हटले आहे की,  शेतकऱ्यांनी येथिल तलावाच्या खालुन सर्वे नं. ५१८ गायरान जमिन आहे. आम्ही सर्व धरणग्रस्त असून ७०% जमिनी तलावात गेल्या आहेत. बाकी ३०% जमिन तलावाच्या खालच्या बाजुला आहेत. शेजारी गायरान जमिन आहे.आम्हाला १९९० साली आपल्या मार्गदर्शना खाली 1 हेक्टर जमिन वस्तीसाठी संपादित केली होती. वस्तीवरील ३३ कूटूंबातील प्रमुखानी प्रत्येकी १९० रुपये एक प्लॉट या प्रमाणे शासकीय चलनाने मार्च १९९१ यावर्षी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा केज ता. केज या बँकेत पैसे भरलेले आहेत व आम्हाला प्लॉट मिळालेले आहेत. तरी राहण्यासाठी १ हेक्टर जमिन व १० गुंठे शाळेसाठी आपल्या कार्यालयाकडुन दिलेली आहे.परंतु तलाव फुटण्याच्या भितीने आम्ही सर्व दि.२७/०७/२०२१ च्या रात्री घरे सोडुन पावसात गायरानात रात्र काढली. आमच्या शेती खांदून गेल्या, विहिरी खरपनाने बुजुन गेल्या, पिके वाहुन गेली, धरणाच्या दगडी पिचिंग च्या वर २ फुट पाणी होते तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला होता.
            त्यात मासेमारी करणारानी जाळे सांडव्याच्या तोंडाला लावल्याने कचरा अडकला व पाण्याचा फ्लो थांबला पाणी तलावात फुगले, अचानक दाबाने जाळे पलटी झाले आणि भिंतीच्या शेजारी पाण्यानी उसळी मारली परंतु बाजूची संरक्षण भिंत फुटून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू झाल्याने
तलाव फुटण्याचा धोका सुदैवाने टळला.
         दरम्यान तलावाच्या कालव्याच्या पुर्वेस आम्हाला रहाण्यासाठी गट नं. ५१८ मध्ये ०४ हेक्टर क्षेत्रा मध्ये वस्तीवाडी द्यावी. एकुण लाभार्थ्यांची संख्या 81 असून राहाण्यासाठी आम्हास जागा व गुरांना गोट्यासाठी जागा ४ हेक्टर मध्ये उपलब्ध करून दयावी. व शासनाच्या नियमा प्रमाणे होणारी रक्कम ही आम्ही भरणा करण्यास बांधील आहोत. तरी सदरील ही जमिन आपल्या स्तरा वरून देण्याची कार्यवाही करावी जेणे करून आम्हाला तलावाचा धोका राहणार नाही. तसेच आमचे पुर्नवसन करावे. अशी मागणी रघुनाथ साहेबराव पवार यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी केली आहे.
शेअर करा
Exit mobile version