Site icon सक्रिय न्यूज

पालकमंत्री धनंजय मुंडे उद्या केज तालुक्यात……!

पालकमंत्री धनंजय मुंडे उद्या केज तालुक्यात……!
केज दि.३ – सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा सुरू असून दि.४ ऑक्टोबर रोजी ते केज तालुक्यातील उंदरी व आरणगाव या दोन गावांना भेटी देऊन संकटात सापडलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत.
              ना.धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.ते विविध ठिकाणी भेटी देऊन नुकसानीची व संकटात सापडलेल्या कुटुंबियांच्या भेटी घेऊन सांत्वन करत आहेत. सदरील दौऱ्यात ते दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता तालुक्यातील उंदरी येथील महादेव बळीराम सोनवणे व उत्तम बन्सी सोनवणे आणि दुपारी 2 वाजता आरणगाव येथील बालाजी ज्ञानोबा सिरसाट यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.
शेअर करा
Exit mobile version