बीड दि.4 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1103 अहवालात जिल्ह्यात आज 17 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 03, आष्टी 02, बीड 05, धारूर 01, गेवराई 01, केज 00, माजलगाव 00, परळी 01, पाटोदा 01, शिरूर 03 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान मागच्या कांही दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होऊ लागली असून आरोग्य विभागावरचा ताण कमी होत आहे.परंतु संख्या जरी कमी होत असली तरी रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.