मुंबई दि.४ – मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकल्यानंतर क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सहभागी असल्यामुळे त्याच्यासह 9 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या सर्वांना आज दुपारी किला कोर्टात हजर करण्यात आले. तसेच या प्रकरणावर सुनावणीझाल्यानांतर कोर्टाने आर्यनच्या कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यामुळे कोर्टात केलेल्या पुराव्यांच्या आधारावर एनसीबीने आर्यनची कोठडी वाढवून मागितली असता कोर्टाने कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे आता आर्यनची रवानगी एनसीबीच्या कोठडीत झाली आहे. तसेच आर्यन खानसह आणखी तिघांना कोठडीत पाठवण्यात येत आहे.अटक करण्यात आल्यानंतर एनसीबीने अधिक तपासही केला. यावेळी ‘आर्यनच्या फोनमधील चॅटमध्ये काही कोडनेम आढळून आले आणि त्याच्या अडचणी वाढल्या. त्यांचा उलगडा करण्यासाठी त्याची कोठडी वाढवून मागितली असल्यामुळे या कोठडीत वाढ झाली आहे. मोबाईलमध्ये सापडलेल्या लिंक्स आणि त्यामागचं रॅकेट उघडून प्रकाश झोतात आणण्यासाठी कोठडी गरजेची असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ड्रग्ज तस्करांशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपत्तीजनक चॅट करण्यात आलं आहे, हे कोर्टासमोर उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातही छापेमारी सुरू आहे,’ अशी माहिती सिंह यांनी न्यायालयाला दिली. आर्यनच्या चॅटमधून पैशांचे व्यवहार झाल्याचेही समोर आले असून बँक व्यवहारांसाठी रोख रकमेची मागणी करण्यात आल्याचा उल्लेखही या चॅटमध्ये असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितले आहे.
दरम्यान, एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यनसह अन्य 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं होत. या सगळ्यांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गंत कलम 20 बी, 8 (सी) 27 आणि 35 सह अन्य कलम लावण्यात आले आहेत. तसेच 20 (बी) कलमांतर्गंत जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करतो त्याला शिक्षा होते. अर्थात मादक पदार्थांची आंतरराज्यीय आयात- निर्यात केल्यास संबंधिताला 10 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.