Site icon सक्रिय न्यूज

अखेर दोन वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध……!

अखेर दोन वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध……!

मुंबई दि.४ – राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मागील दोन वर्षांपासून आयोगाकडून कोणतीही जाहिरात प्रसारित झाली नव्हती. पण, आता आयोगानं 2021 च्या परीक्षेचं वेळापत्रक जारी केलं आहे.

आज सोमवारी राज्य लोकसेवा आयोगामार्फत 290 जागांच्या पदभरतीची जाहीरात संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीमध्ये पूर्व परीक्षेची तारीख 2 जानेवारी 2022 असणार आहे. तसेच राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही दिनांक 7,8 आणि 9 मे 2022 ला घेण्यात येणार आहे. आयोगानं पूर्व परीक्षेच्या तीन महिने आधी वेळापत्रक जाहीर केल्यामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळं मागील दीड वर्षांपासुन कोणतीही मोठी पदभरती झालेली नाही. आगामी जाहिरातीमध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, गटविकास अधिकारी आणि अन्य पदांसाठी भरती होणार आहे.

दरम्यान, 2 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुरूवात 5 ऑक्टोंबर 2021 दुपारी 2 वाजल्यापासून ते 25 ऑक्टोंबर 2021 रात्री 11.59 मिनिटांपर्यंत असणार आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 544 रूपये तर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 344 रूपये इतकं शुल्क असणार आहे.

शेअर करा
Exit mobile version