Site icon सक्रिय न्यूज

ढाकेफळ जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना  सॅनिटायझर व मास्क चे वाटप……!

ढाकेफळ जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना  सॅनिटायझर व मास्क चे वाटप……!
केज दि.५ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकेफळ या शाळेत दि.5 ऑक्टोबर, मंगळवार रोजी मोफत सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले.
               शिक्षण प्रेमी नागरिक तथा
माजी सरपंच भाऊसाहेब घाडगे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष छाया भाऊसाहेब घाडगे यांनी स्वखर्चातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर खरेदी केले. इयत्ता पाचवी ते सातवी च्या सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्क चे मोफत वाटप करण्यात आले. तसेच शालेय पोषण आहार कामगार यांनाही
सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोरोना आजाराची भीती न बाळगता,  दररोज शाळेत उपस्थित रहावे. तसेच शाळेत आल्यानंतर पूर्णवेळ मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, वारंवार साबणाने हात धुणे ही काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी.असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा छाया घाडगे यांनी केले. तर शाळेबाबत असलेल्या अडचणी चंद्रकांत चाटे (मुख्याध्यापक) यांनी मांडल्या. माजी सरपंच भाऊसाहेब घाडगे यांनी सर्व अडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.तसेच यावेळी शासनाने दिलेल्या मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप ही करण्यात आले.
             दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी भाऊसाहेब घाडगे व छाया घाडगे यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चाटे व तरकसबंद यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका श्रीमती नेहरकर, मोराळे, साखरे व  कदम या उपस्थित होत्या.
शेअर करा
Exit mobile version