Site icon सक्रिय न्यूज

आदर्श बहुजन शिक्षक संघ (इब्टा) शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी संघटनेची गेवराई तालुका कार्यकारणी जाहीर !!!

आदर्श बहुजन शिक्षक संघ (इब्टा) शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी संघटनेची गेवराई तालुका कार्यकारणी जाहीर !!!
बीड दि.6 – आदर्श बहुजन शिक्षक संघ (इब्टा) या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह बीड येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल विद्यागर यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा सचिव मदन सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी सानप, जिल्हा उपाध्यक्ष सतिष चिंचकर, गणेश दळवी, शेख चाँदपाशा महेबुब, जिल्हा सहसचिव शिवदास राठोड, सुरेश कांबळे, सोमिनाथ दौंड, जिल्हा सहकार्याध्यक्ष गणपत पाबळे, बाळू शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली.
                        सदरील बैठकीमध्ये सर्वानुमते कें.प्रा.शा. मन्यारवाडीचे सहशिक्षक विकास भिकचंद घोडके यांनी कोविड निधी जमा करण्यासाठी पुढाकार, विविध सामाजिक कार्यात सहभाग, शाळास्तरावर गुणवत्ता पूर्ण शिक्षण, इब्टाचे ता. सचिव असतांना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले उल्लेखनिय कार्य या सर्व कार्याची दखल घेवून त्यांची गेवराई तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर तालुकाध्यक्ष विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.    यामध्ये सचिव पंकज भारतराव क्षीरसागर प्रा.शा. शिंपेगाव, कार्याध्यक्ष सुभाष आसाराम भास्कळ प्रा.शा. माणकापूर, उपाध्यक्ष युवराज रामराव बजगुडे प्रा.शा. कोपरा, दत्तात्रय शेषराव वारे प्रा.शा. नंदपूर, राहुल किसनराव साळवे प्रा.शा. चिखली, अशोक सर्जेराव खटके प्रा.शा. कवडगाव, कोषाध्यक्ष नवनाथ दामोदर राऊत प्रा.शा. पाचपीर वस्ती, सहसचिव एजाज सय्यद गणी प्रा.शा. रेवकी, सहकार्याध्यक्ष प्रल्हाद गंगाराम गिरी प्रा.शा. जोहारवाडी, तालुका समन्वयक सुमंत विष्णु यादव प्रा.शा. धानोरा, संपर्क प्रमुख राठोड संजय वाचू प्रा.शा. जिवलातांडा, संघटक सचिन चांगदेव तहकीक प्रा.शा. महारटाकळी, लक्ष्मण रामभाऊ लोंढे प्रा.शा. मारूतीचीवाडी, प्रवक्ता गणेश सारंगधर सरग मा.शा. उमापूर, प्रसिध्दी प्रमुख अमर रामनिवास भुतडा प्रा.शा. अंतरवाली, कार्यालयीन सचिव – शेख मुख्तार अब्बास मा.शा. उमापूर, गंगाधर हनुमंतराव धर्माधिकारी प्रा.शा.राहेरी, मार्गदर्शक नवनाथ अंबादास पोटे प्रा.शा. राजपिंप्री, संजय किसनराव साळवे प्रा.शा.रांजनी, नानासाहेब गाडे प्रा.शा. बागपिंपळगाव.
सदरील झालेल्या निवडीबद्दल गट शिक्षणाधिकारी मिलींद तुरूकमारे, केंद्र प्रमुख विलास झाजुर्णे, केंद्रीय मुख्याध्यापक भारत येडे यांच्यासह विविध संघटनेचे, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले.
                  सदरील बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष शाहुराव जायभाये, जानकीराम  कुरूंद, सुदाम राऊत, बापु खंदारे, गणेश वाघ, धर्मराज भारती, अनिल गायसमुद्रे, बाबासाहेब गायकवाड, उत्तरेश्वर वंजारे, बालासाहेब मंदे, कोषाध्यक्ष नानासाहेब राख, संघटक एकनाथ राहिंज, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवि भंगवाड, सुरेश पारवे, अप्पा सुरवसे, विठ्ठल वाघमारे, महिला जिल्हा पदाधिकारी माया तेलंग, संगीता वाघमारे, सुनीता गायकवाड, संगिता कांबळे, रेखा सवाई, आशा उजगरे, आशा सुरवसे, अनिता गायकवाड इत्यादी पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version