केज दि.6 – तालुक्यातील नायगाव येथे दि. 28 रोजी उंदरी नदीच्या पुरामुळे अतिशय दयनीय परिस्थिती निर्माण झाली होती. शेतीचे अतोनात नुकसान झाले. तीन ते चार फूट जमीन वाहून गेली तर लोकांच्या घरात पाणी शिरले होते.मात्र त्याचेच व्हिडीओ व फोटो पाहून संवेदनशील व्यक्तींकडून मदतीचे हात पुढे आले आहेत.
पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांची घरे पाण्यात गेली होती. त्याचेच फोटो व व्हिडीओ पाहून अर्चना ताई सानप यांनी परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन सदरील बाब सचिन ढवळे मित्र मंडळ यांच्या समोर परिस्थिती मांडून त्याच्या साहाय्याने डी एड बी एड असोसिएशनच्या अर्चना सानप यांच्या माध्यमातून नायगाव येथे 10 किराणा किट तसेच संसार उपयोगी भांडी देण्यात आली.
यावेळी उपस्थित डी एड बी एड असोसिएशनच्या राज्य उपाध्यक्ष अर्चना सानप,जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी मुंडे, बीड तालुका अध्यक्ष ज्योती खंदारे, दीपक साखरे,अभिषेक सोळंके, कोमल मस्के, संभाजी ब्रिगेड चे राहुल खोडसे, ग्राम पंचायत सदस्य श्याम खोडसे आदी उपस्थित होते