केज दि.6 – रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना वाहतुक सुरळीत करण्यासाठी उपाय योजना न केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यास संबंधित कंपनीच्या गलथानापणामुळे पुन्हा मातीच्या ढिगाऱ्यावर कार जाऊन अपघात दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री घडला. मात्र सुदैवाने अपघात होताच गाडीतील एअर बॅग ओपन झाल्यामुळे आतील प्रवाशी बचावले आहेत.
अंधारात रस्त्याच्या कडेला खोदलेले खड्डे तसेच काम चालू असलेले दिसण्यासाठी त्या ठिकाणी रेडियम, साइन ग्लो किंवा विद्युत दिवे लावले जात नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. साळेगाव येथील शंकर विद्यालया जवळ रस्त्यावर टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला गाडी धडकली. त्याच वेळी त्या गाडीतील सुरक्षेसाठी असलेल्या एअर बॅग ओपन झाल्याने अनर्थ टळला. मात्र गाडीचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, केज ते साळेगाव महामार्गावर रस्ता खराब झाल्यामुळे मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु रस्त्याचे काम सुरू असताना या रस्त्यावरून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुरक्षिततेची कोणतेही उपाय योजना केलेली नाही. तसेच त्या ठिकाणी सूचना फलक लावलेले नसून रात्रीच्या वेळी मोठा धोका निर्माण झाला आहे.