Site icon सक्रिय न्यूज

दुचाकी रस्त्यात आडवी लावून महिलेचा विनयभंग……!!! 

दुचाकी रस्त्यात आडवी लावून महिलेचा विनयभंग……!!! 
 केज दि.६ – शेतातून घरी येत असलेल्या २८ वर्षीय महिलेस रस्त्यात दुचाकी आडवी लावून तिचा विनयभंग केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
     केज तालुक्यातील एका गावातील २८ वर्षीय महिला ही ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतातून घराकडे निघाली होती. आरोपी गजेंद्र महादेव लोंढे  याने रस्त्यात या महिलेच्या समोर दुचाकी आडवी लावून तिला अडविले. त्याने तू कामाला का जातेस, तुला काय कमी आहे असे म्हणत या महिलेच्या डाव्या हाताला धरुन विनयभंग केला. कोणाला सांगितल्यास जिवे मारून टाकीन अशी धमकी ही दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गजेंद्र लोंढे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार जसवंत शेप हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version