Site icon सक्रिय न्यूज

राज्यातील मंदिरे खुली; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते मोफत बससेवेचा शुभारंभ……!!!

राज्यातील मंदिरे खुली; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते मोफत बससेवेचा शुभारंभ……!!!
परळी दि.7 – राज्यातील मंदिरे व सर्व प्रार्थनास्थळे आजपासून दर्शनासाठी खुली करण्यात आली असून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पहाटे 5 वाजता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या वेळी उपस्थित राहून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. प्रभू वैद्यनाथाची आज विशेष पूजा करण्यात आली असून ना. धनंजय मुंडे हे या पूजेस उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व सर्वत्र दिवे लावण्यात आले होते.
               सरकारने योग्य वेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला असून, याबद्दल  मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. भाविकांनी सामाजिक अंतर राखत, मास्कचा वापर करावा तसेच कोविड विषयक नियमावलीचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे. यावेळी डोंगर तुकाई व काळरात्री देवीच्या दर्शनासाठी भाविकांना ये-जा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत बस सेवेचा ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच ना. धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील काळरात्री देवी मंदिर व आरोग्य देवी डोंगर तुकाई येथे दर्शन घेऊन नवरात्रोत्सवाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
शेअर करा
Exit mobile version