Site icon सक्रिय न्यूज

विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ……!

विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ……!
परभणी दि.९ – राज्यभरात नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावण होते.  मात्र परभणी जिल्ह्यातील एक शाळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 1 आठवड्यासाठी बंद करावी लागली आहे.
                  परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मानवत शहरातील गर्दीचे ठिकाणे 16 ऑक्टोबर पर्यन्त बंद केले असताना आता पूर्णा तालुक्यातील गौर गावातील सोमेश्वर माध्यमिक विद्यालय 1 आठवड्यासाठी बंद करण्यात आले आहे. या विद्यालयातील  विद्यार्थी आणि शिक्षक अश्या 69 जणांच्या कोरोनाच्या चाचण्या केल्या होत्या. त्यात एक विद्यार्थी कोरोना पॉजिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 1 आठवड्यासाठी सदर शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दिली आहे.
         दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या पांगरी येथे वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सात दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिन्नर, निफाड आणि येवल्यात सातत्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या तालुक्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.
शेअर करा
Exit mobile version