Site icon सक्रिय न्यूज

सर्व ऊसतोड कामगारांनी कोरोना लस घ्यावी – डॉ. शिला कांबळे…..!

सर्व ऊसतोड कामगारांनी कोरोना लस घ्यावी – डॉ. शिला कांबळे…..!
केज दि.९ – तालुक्यातील विडा परिसर सर्वात जास्त मजूर ऊसतोड कामगाराचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील दरवर्षी किमान पन्नास हजार पेक्षा अधिक लोक ऊसतोडणी साठी कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम महाराष्ट्र इ. ठिकाणी उसतोडणी साठी जातात. त्यामुळे उसतोडणीला गेल्यानंतर तिथे कसल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये यासाठी सर्वांनी लस घेण्याचे आवाहन डॉ. शिला कांबळे यांनी केले आहे.
             सध्या करोनाचे संकट लक्षात घेऊन 18 वर्षा वरील सर्व ऊसतोड कामगार यांनी विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या 5 उपकेंद्र मध्ये करोनाचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध आहे. ऊसतोड मजूर उसतोडणीसाठी गेल्यावर ते काही अशा ठिकाणी जातात.अनेक ठिकाणी दुरदूरवर दवाखना किंवा गाडीची सोय नसते. त्यामुळे भविष्यात त्याना आरोग्य विषयक अडचणीचा सामना करण्यापेक्षा त्यांनी लस घेऊन आपले आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळून घ्यावे. आतापर्यंत विडा आरोग्य केंद्रात 18793 एवढे डोस झाले असून यात पहिला डोस 14461 तर दुसरा डोस 4332 नागरिकांनी घेतला आहे. विडा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत येणारे एकूण 40 गावे असून यात येणारी लोकसंख्या ही सत्तर हजारा पेक्षा जास्त आहे.
            दरम्यान विडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गावागावात जाऊन करोना विषय जनजागृती करत आहेत. भविष्यात तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आठ ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत कवच कुंडल मिशन कार्यक्रम सरकारने आयोजित केला असून यात आरोग्य कर्मचारी सकाळी सात वाजे पासून ते सांयकाळी 5 पर्यंत गावोगावी जाऊन लस देण्यार आहेत. त्यामुळे लस घेण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन विडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. शिला कंबळे यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version