Site icon सक्रिय न्यूज

केजमध्ये विदेशी दारू पकडली, मटका घेणारेही दोघे अटक……!

केजमध्ये विदेशी दारू पकडली, मटका घेणारेही दोघे अटक……!
केज दि.१० – केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करीत ५३ हजार ३०० रुपयांची विदेशी दारू पकडली. तर दोघांना मटका घेताना अटक करून त्यांच्याकडून १९ हजार ८२० रुपयांचा माल जप्त केला. या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
      केजला उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पंकज कुमावत हे रुजू झाल्यानंतर शहरातील व ग्रामीण भागातील राजरोसपणे सुरू असलेले बहुतांश अवैध बंद झाले आहेत. मात्र मटका नावाचा जुगार चोरून मोबाईलवर सुरू आहे. शनिवारी पंकज कुमावत व त्यांचे सहकारी बालाजी दराडे, राजू वंजारे, मधुकर तांदळे, बाबासाहेब बांगर यांच्या पथकाने छापा मारून ५३ हजार ३०० रुपये किंमतीचा मॅकडॉल कंपनीच्या विदेशी दारूचा साठा जप्त करून विकास बब्रुवान वाघमारे ( रा. क्रांती नगर, केज ) यास अटक केली. दुसरी कारवाई धारूर रस्त्यावरील भवानी माळ परिसरात करून सुशिल संतराम सत्वधर ( रा. भवानी माळ, केज ) यास मोबाइलच्या व्हॅटसअपव्दारे कल्याण नावाचा मटका घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून नगदी आणि मोबाईल असा १२ हजार ८७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्यानंतर गावरान हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत चालता – फिरता मटका नावाचा जुगार खेळविताना दिलीप नवनाथ गायकवाड ( रा. सुकळी, ह. मु. गुंडगल्ली, केज ) यास ताब्यात घेतले. जमादार बालाजी दराडे व बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादीवरून विकास वाघमारे, सुशील सत्वधर, दिलीप गायकवाड, बुकी मालक चाँद इस्माईल शेख या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(धारूर येथेही कारवाई करण्यात आली)
शेअर करा
Exit mobile version