केज दि.११ – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागण्या मागणा-या शेतक-यांना भाजपाच्या योगी सरकारकडुन चिरडून टाकल्याच्या घटनेचा महाविकास आघाडी सरकारच्या व सर्व घटक पक्षाच्या वतीने केज तालुका व केज शहर बंद पाळुन जाहिर निषेध करण्यात आला.
तहसीलदार दुलाजी मेंडके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घटनेतील सर्व आरोपींना कडक शिक्षा करुन उत्तर प्रदेशमधील जुलमी योगी सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी केज तालुका काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व इतर घटक पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली. तसेच प्रियांका गांधी यांना तुरुंगात डांबून इंग्रज राजवटीचा परिचय करून देणा-या अत्याचारी भाजप सरकारचा तिव्र शब्दाध निषेध करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे, बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल सोनवणे, युवा नेते पशुपतीनाथ दांगट, शिवसेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे, माजी तालुकाध्यक्ष प्रवीण कुमार शेप, मोहन गुंड, राहुल खोडसे, मुकुंद कणसे, बालासाहेब बोराडे, अरविंद थोरात, छावा चे अध्यक्ष शिवाजी ठोंबरे, कबिरोद्दीन इनामदार, दलील इनामदार, अमर पाटील, कपिल मस्के, संगीता साळवे, कविता कराड, शिसेनेच्या रत्नमाला मुंडे, सय्यद शरीफ लक्ष्मण जाधव, अरुण गुंड, अंगद गुंड, समीर देशपांडे, सचिन रोडे, ताहेर खुरेशी, मझर शेख, दिनकर राऊत, शेखर सिरसट, युराज डबरे, अक्षय गीते मुज्जू खुरेशी, हनुमंत लोंढे, बबलू साळवे, साजेद इनामदार, समीर इनामदार, निशांत जाधव, राहुल शिंदे रोहित थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.