मुंबई दि.१४ – अनंत करमुसे मारहाण प्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन जामिनावर सोडण्यात आलं. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. अनंत करमुसे या व्यक्तीचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच गुन्ह्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. ठाणे पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली.
जिंतेद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलं होतं. तसेच अटक करुन ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना कोर्टासमोरदेखील हजर केलं होतं. या प्रकरणात कोर्टाने त्यांना तत्काळ जमीनदेखील दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती.जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता. नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते. याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.