केज दि.१५ – तालुक्यातील कुंबेफळ येथील अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन एका टपरी चालकाच्या मुलीने एमपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन करूत वर्ग १ ची पशुधन विकास अधिकारी या पदावर मजल मारल्याने तीचे गावकऱ्यांच्या वतीने कौतुक होत आहे.
पूजा महादेव घाडगे या विद्यार्थ्यांथीनेने एमपीएससी मार्फत २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठं यश संपादन केले असून तिने पशुधन विकास अधिकारी वर्ग १ या पदावर तिचे नियुक्ती झाली आहे. पुजाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील शाळेतच झाले आहे. तर तिचे उच्च माध्यमिक शिक्षण हे अंबाजोगाई येथे झाले. तर पदवीचे शिक्षण तिने परभणी येथे केले. तीन बहिणी व घरची परिस्थिती अतिशय बिकट असताना देखील पूजाने आपल्या शिक्षणात याचा अडसर येऊ दिला नाही. तिच्या वडिलांनी देखील पान टपरी चालवत आपल्या मुलीला या शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा अशा परिस्थितीत सुद्धा उपलब्ध करून दिल्या. पूजाने देखील याचे चीज करत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
तिच्या या यशाबद्दल सर्व ग्रामस्थांसह सुरेश नाना थोरात यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.