Site icon सक्रिय न्यूज

केज तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात येणार…….!

केज तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात येणार…….!
केज दि.१६ – शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रु अनुदान द्यावे. मराठा व ओबीसी आरक्षण आणि शेतमजूर यांनाही अनुदान देण्यात यावे. या मागणीसाठी केज तालुका रिपाईंच्या वतीने २० ऑक्टोबर रोजी केज तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
                   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आणि युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशा नुसार दि. २० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे. ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण देण्यात यावे. त्याच बरोबर या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून महाराष्ट्र शासनाने हेक्‍टरी १० हजार रुपये जाहीर केलेली मदत; ही अत्यंत तोकडी व कमी आहे. म्हणून राज्य शासनाने याचा फेरविचार करून कोणत्याही सर्वेक्षणाची वाट न पाहता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याच बरोबर भूमिहीन व शेतमजूर यांनाही नुकसान भरपाई अनुदान देण्यात यावे. तसेच मागासवर्गिय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरू ठेवून त्याचा लाभ द्यावा. या मागणी करिता केज तहसील कार्यालया समोर तालुका अध्यक्ष दीपक कांबळे आणि जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या संदर्भात केज तहसीलदार आणि सहाययक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, यांना निवेदन देण्यात आले.
              निवेदनावर  तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, माजी तालुका अध्यक्ष राहुल सरवदे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, शहराध्यक्ष भास्कर मस्के, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, सरचिटणीस दिलीप बनसोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.तसेच आंदोलनात तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version