Site icon सक्रिय न्यूज

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक अन सुटका……!

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक अन सुटका……!

नवी दिल्ली दि.18 – टीम इंडियाचे माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला त्यांच्याच सहकारी क्रिकेटपटूबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी हरियाणामध्ये अटक करण्यात आली. डावखुरा भारतीय क्रिकेटपटू युवराजला शनिवारी 16 ऑक्टोबरला हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी येथे अटक करण्यात आली. युवराजवर जातीवादी शब्द वापरल्याचा आरोप होता, ज्याची तक्रार गेल्या वर्षी करण्यात आली होती. यानंतर एससी-एसटी कायद्याच्या प्रकरणात त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. आता रविवारी त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली. मात्र, त्यालाही लगेच जामीन मिळाला. पण तक्रारदार वकील आणि सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल असमाधान व्यक्त केले. पोलिसांनी त्याच्यावर योग्य कारवाई केली नाही. तसेच पोलिसांनी युवराज सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोपही केला. लवकरच अंतरिम जामिनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचंही रजत कलसन यांनी सांगितले.

युवराज सिंह गेल्या वर्षी त्याच्या एका बेजबाबदार टिप्पणीमुळे वादात सापडला होता. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान इतर अनेक खेळाडूंप्रमाणे युवराज सिंहदेखील आपल्या सहकारी खेळाडूंसह इंस्टाग्राम लाईव्हवर बोलत होता आणि चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मासोबत असेच एक लाईव्ह चॅट केले. या लाईव्हदरम्यान युवीने भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलबद्दल एक शब्द वापरला होता, जो जातीवादी टिप्पणीच्या कक्षेत आला होता.

दरम्यान, युवराजच्या या वक्तव्यानंतर बराच वाद झाला आणि सोशल मीडियावर त्याच्या विरोधात बरीच मोहीम सुरू झाली. दुसरीकडे सोशल मीडिया व्यतिरिक्त हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हंसी येथील वकील रजत कलसन यांनी माजी भारतीय क्रिकेटपटूविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर एससी-एसटी कायद्याच्या कलमांखाली युवराजविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. हे वकील गेल्या वर्षापासून युवराजच्या अटकेची मागणी करत होते.

शेअर करा
Exit mobile version