केज दि.१९ – तालुक्यातील साळेगाव येथे बालासाहेब रामलिंग गित्ते (२८) या युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
सदरील आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे तो खचला असल्याचे बोलल्या जात आहे. सदरील युवकाचा मृतदेह साळेगाव लवन नावाने ओळखल्या जात असलेल्या शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी केज पोलीस दाखल होत आहेत.