Site icon सक्रिय न्यूज

राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई कार्यालयाने केला दारू साठा जप्त…..! 

राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई कार्यालयाने केला दारू साठा जप्त…..! 
बीड दि.१९ –  कार्यालय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आंबेजोगाई यांनी दिनांक 19/10/2021 रोजी केज तालुक्यातील बानेगाव गावच्या हद्दीत विलास चंद्रकांत मोराळे यांचे शेतातील गोठयात छापा मारुन गोवा राज्य निर्मीत व महाराष्ट्र राज्यात विक्रीस परवानगी नसलेल्या officer choice whisky च्या 180 मिली क्षमतेच्या 288 सिलबंद बाटल्या (6 बॉक्स), असा एकुण अंदाजे किंमत रु. 37440 इतक्या किंमतीचा मुददेमाल  जप्त करण्यात आला. सदर गुन्हयामधील आरोपी फरार झाला असुन त्याचा तपास सुरू आहे. आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65अ व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला असून गुन्हयातील अन्य संशयित इसमाचा शोध सुरु आहे.
             सदर कारवाई विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद विभाग औरंगाबाद श्री. पवार  तसेच नितिन घुले, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर. के. बागवान, अरुण सी. खाडे , सहाय्यक दुय्यम निरीक्षक सादिक सय्यद व जवान स्टाफ सर्वश्री रुपसिंग जारवाल, श्रीराम धस, राम डुकरे,अशोक शेळके व मस्के यांनी सहभाग घेतला.
            दरम्यान, नितीन घुले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांनी परराज्यातील मद्य विक्री विरोधात मोहीम हाती घेतली असून नागरिकांना अवैद्य मद्य निर्मिती,विक्री व वाहतूक ताडी विक्री, हा दारू विक्री निर्मिती या विषयी काही माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास समोर येऊन माहिती द्यावी असे आवाहन श्री नितीन घुले साहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांनी जनतेस केले आहे
शेअर करा
Exit mobile version