Site icon सक्रिय न्यूज

गुटखा उतरून घेताना पोलिसांचा छापा…….!  

गुटखा उतरून घेताना पोलिसांचा छापा…….!  
बीड दि.२० – गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील उमापूर गावा लगतच्या मारुतीचीवाडी  या वस्तीजवळ सोपान विठ्ठलराव भोसले यांच्या शेतामध्ये असलेल्या गोडाऊन मध्ये आयशर टेम्पो MH 11 M 4553 यामधून गुटखा उतरून गोडाऊन मध्ये काही इसम साठा करत असताना दि.१९ रोजी सायंकाळी ६ वाजता  छापा मारला असता पाच इसमांना जागीच पकडण्यात आले.
             त्यामध्ये अजित अशोक पाटणे रा. उमापूर (गुटखा मालक), विठ्ठल विष्णू काठोळे रा. नामलगाव फाटा, बीड (टेम्पो चालक), सुदाम बाबासाहेब काठोळे रा. नामलगाव फाटा,बीड (लेबर), रामेश्वर विष्णू कातकडे रा. उमापूर (लेबर ), नवनाथ अशोक राऊत रा.उमापुर (लेबर) आणि टेम्पो व गोडाऊनमधील एकूण 12 लाख 3 हजार 800 रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात आला. तसेच 5 लाख रुपये किमतीचा जुना आयशर टेम्पो असा एकूण 17,03,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
             चकलांबा पोलिस ठाण्यात पकडलेले 5 आरोपी आणि आयशर टेम्पो मालक, गुटख्याचा भागीदार मालक नामे बाळू बाबुराव बहिरवाळ उर्फ बाळू गुजर, गोडाऊन भाड्याने देणारे गोडाऊन चे मालक सोपान विठ्ठलराव भोसले असे 8 आरोपी  विरुद्ध भादवि कलम 328, 272, 273,34 सह मोटार वाहन कायदा 130(3)/177 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
शेअर करा
Exit mobile version