केज दि.२० – शासनाच्या निष्काळजी पणामुळे युसूफवडगांंव सह इतर गावातील जनतेच्या कित्येक मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील युसुफवडगाव येथे केज रिपाइंच्या वतीने येथे भव्य निदर्शने करण्यात आली.
युसूफवडगांवसह अनेक गावात नागरिकांच्या हिताचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर कोणीही आवाज उठवत नसल्याने या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिपान हजारे यांच्या नेतृत्वाखाली युसुफवडगांंव पोलीस स्टेशन येथे रिपाइंच्या वतीने भव्य निदर्शने व मोर्चा काढण्याचे आयोजिले होते. त्यानुसार दि.२० रोजी रिपब्लिकन पार्टी च्या वातीनी भव्य निदर्शने करण्यात आली. यामध्ये युसूफ वडगाव येथील स.नं 04 मधील कबल्याची नोंद ७/१२वर घेणे, युसूफ वडगाव परिसरात आवेध धंदे बंद करावे, लाडेगाव येथील गायरा जमीन पीक पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत करण्यात यावी तसेच कार्यकरत्यावर ३९५ गुन्हा माघे घेण्यात यावे व इतर मागण्या साठी निदर्शने करण्यात आली. तालुक्याचे आरपीआय तालुकाध्यक्ष सुनिल हिरवे, तालुका उपाध्यक्ष अनिल उजगरे व सोशल मीडिया प्रमुख राहुल उजगरे तसेच सर्कल प्रमुख पप्पू निशिगंध यांच्या नेतृत्वाखाली व अनिल रेखा भुईंगळे सुनीता निशिगंधा मंदाकिणी उजगरे, संध्या लांडगे, बेबी ताई उजगरे, रुक्मिणी सातपुते, मनीषा सातपुते उजगरे, राहुल उजगरे भीमराव धीरे दीपक धीरे सचिन ठोकळ,दिनकर मस्के,सुभाष हजारे,लाला हजारे,सुमित उजगरे,महादेव बचूटे,जितेंद्र मस्के,वसंत हिरवे,अमोल मस्के,बाबासाहेब मस्के,बारीक मस्के,पपू सातपुते,नितीन बचूटे,अनिकेत सातपुते आदी व कार्यकरते उपस्थित होते.