केज दि.२१ – शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रु अनुदान द्यावे, मराठा – ओबीसी आरक्षण आणि शेतमजूर यांनाही अनुदान देण्यात यावे. या मागणीसाठी केज तालुका रिपाईंच्या वतीने २० ऑक्टोबर रोजी केज तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशा नुसार दि. २० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे. ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण देण्यात यावे. त्याच बरोबर या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून महाराष्ट्र शासनाने हेक्टरी १० हजार रुपये जाहीर केलेली मदत; ही अत्यंत तोकडी व कमी आहे. म्हणून राज्य शासनाने याचा फेरविचार करून कोणत्याही सर्वेक्षणाची वाट न पाहता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयाचे नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याच बरोबर भूमिहीन व शेतमजूर यांनाही नुकसान भरपाई अनुदान देण्यात यावे. तसेच मागासवर्गिय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरू ठेवून त्याचा लाभ द्यावा. या मागणी करीता तालुका अध्यक्ष दीपक कांबळे आणि जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू झाले आहे.
आंदोलनात गोवर्धन वाघमारे, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, केज विकास संघर्ष समितीचे हनुमंत भोसले, राहुल सरवदे, रवींद्र जोगदंड, नगरेवक शेषेराव कसबे, भास्कर मस्के, रमेश निशिगंध, बाळासाहेब ओव्हाळ, विकास आरकडे, गौतम बचुटे, दिलीप बनसोडे, कैलास जावळे, अजय कांबळे, संभाजी हजारे, मिलिंद सुमित, कांबळे बाळासाहेब, कांबळे भालेराव, बाबासाहेब शिंदे, माऊली इंगळे हे सहभागी झाले आहेत.