केज दि.२१ – केज उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांच्या पथकाने चौसाळा येथे तीन जुगार अड्ड्यावर धाड टाकून चौघांना तर एका हॉटेलवर धाड टाकून एकास ताब्यात घेतलेअसून मुद्देमाल जप्त केला आहे.
चौसाळा येथे दि.२१ ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजता पोलीस कर्मचारी बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पंडाने तसेच शेंडगे यांनी तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड टाकून चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 21 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.तसेच वाडा नावाच्या हॉटेलवर छापा मारून तीन हजार रुपये किंमतीचा बेकायदेशीर दारूचा साठा जप्त करून एकास ताब्यात घेतले.
दरम्यान पंकज कुमावत हे केज उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून विभागातील अवैध धंदे करणारे धास्तावले असून अनेकांनी तर कारवाईच्या भीतीने आपला गाशा गुंडाळला आहे. मात्र सर्वसामान्य लोक सदरील कारवायांचे स्वागत करत आहेत.