Site icon सक्रिय न्यूज

सर्व अपेक्षा पोलिसांवर लादण्या ऐवजी प्रत्येकाने कायद्याला मदत केली पाहिजे – आर.राजा……!

सर्व अपेक्षा पोलिसांवर लादण्या ऐवजी प्रत्येकाने कायद्याला मदत केली पाहिजे – आर.राजा……!
केज दि.२२ – आपल्या परिसरात घडत असलेले गुन्हे रोखण्या संदर्भात नागरिकांनीही सजग राहणे आवश्यक असून गुन्हे रोखण्यासाठी सर्वांच्या मदतीची अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी व्यक्त केली. तर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैद्य धंद्या संदर्भात नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करीत अन्याय अत्याचारा संदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
                 केज पोलीस स्टेशनमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक आरा राजा, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पोलिसांकडे मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे आहे ती कुमक वापरून पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. गुन्हे रोखण्या संदर्भात प्रत्येक सूज्ञ नागरिकांनी पोलिसांना मदत करणे आवश्यक आहे. तसेच छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण तंटे करण्यापेक्षा सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. तसेच गुन्हे रोखण्या संदर्भात व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही लावणे, खाजगी सुरक्षा रक्षक नेमणे इत्यादी उपाय योजनांची माहिती सांगितली. तर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्यांच्या हद्दीतील अवैद्य धंदे रोखण्यासंदर्भात थेट संपर्क साधण्याचे आवाहन करीत अन्याय अत्याचारा संदर्भात कोणतेही गुन्हे टाळले गेले नाही पाहिजे हे सांगितले. तसेच छोट्या व्यावसायिकांना जागा उपलब्ध करण्या संदर्भात कार्यवाही व्हायला हवी याची माहिती दिली.
        यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी, प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक प्रमोद यादव सर्व सहायक पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.
शेअर करा
Exit mobile version