केज दि.23 – विड्यातून जिवाचीवाडीकडे निघालेल्या दुचाकीस्वाराची दुचाकी रस्त्याच्या वळणावरून रस्त्याच्या खड्यात गेली. या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी केजच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
जिवाचीवाडी येथील अनिल मधुकर चौरे ( वय ३५ ) हा तरुण शनिवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास विडा येथून आठवडी बाजार करून दुचाकीवर ( एम. एच. ४४ एफ ७८४६ ) जात गावाकडे निघाले होता. विड्यापासून जवळच असलेल्या तळ्याजवळील वळण लक्षात न आल्याने त्याची रस्त्याच्या कडेला खड्यात जाऊन पडली. या अपघातात अनिल चौरे जखमी झाला असून त्याला उपचारासाठी केजच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.