केज दि.२३ – पतीला खोटे का सांगितले अशी विचारणा करणाऱ्या एका महिलेस अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील २५ वर्षीय महिलेने २१ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या तिच्या घरासमोरून जाणाऱ्या इंद्रजित दत्तु ढाकणे ( रा. सारुळ ता. केज ) यास तू पतीला फोनवरून माझ्याबद्दल खोटे का सांगितले अशी विचारणा केली. त्यावरून इंद्रजित ढाकणे याने अश्लिल भाषेत आणि या महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे बोलत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तर शिव्या देऊ नका म्हणणाऱ्या तिच्या सोबतच्या महिलेस ही त्याने लाथाबुक्यानी मारहाण करुन मुक्कामार दिला. अशी फिर्याद सदर महिलेने दिल्यावरून इंद्रजित ढाकणे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नांदूरघाट चौकीचे जमादार गोविंद बडे हे पुढील तपास करत आहेत.