Site icon सक्रिय न्यूज

दारू पिण्यास पैसे न दिल्यावरून मारहाण……! 

दारू पिण्यास पैसे न दिल्यावरून मारहाण……! 
केज दि.24 – दोघांनी अडवून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र पैसे नसल्याचे कारण सांगताच युवकास शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण करुन त्याच्या खिशातील ५ हजार पाचशे रुपये काढून घेतल्याची घटना केज तालुक्यातील मस्साजोग येथे घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
     मस्साजोग येथील स्वप्नील सतिष जाधव हा युवक २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता रस्त्याने जात असताना त्याला गावातील मानसी बार समोरील रस्त्यावर अडवून सिध्दार्थ भिवा सोनवणे, कुशल आश्रुबा धिवार ( दोघे रा. मस्साजोग ) या दोघांनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. स्वप्नील जाधव याने पैसे नसल्याचे सांगताच सिद्धार्थ व कुशल यांनी शिवीगाळ व लाथाबुक्कयाने मारहाण करुन मुक्का मार दिला. त्याच्या पँटच्या खिशातील पाच हजार पाचशे रुपये काढुन घेत तु जर कुणाला सांगितलेस तर तुला जिवे मारुन टाकुत अशा धमक्या दिल्या. अशी फिर्याद स्वप्नील जाधव याने दिल्यावरून सिद्धार्थ सोनवणे व कुशल धिवार या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे हे पुढील तपास करत आहेत.

भोपला येथे सोयाबीन काढणीचे पैसे मागितल्यावरून डोके फोडले 

सोयाबीनचे पीक काढणीचे पैसे मागितल्यावरून एका शेतकऱ्यास शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण करीत डोक्यात लोखंडी गज मारून डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील भोपला येथे घडली. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
       भोपला येथील शेतकरी आश्रुबा धोंडीबा गोंड ( वय ५० ) हे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास सोयाबीनचे पीक काढणीचे पैसे मागण्यासाठी अंबऋषी मोहनराव गोंड यांच्या घरी गेले होते. यावेळी सुशील अंबऋषी गोंड याने तुमचे कशाचे पैसे असे म्हणत शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण केली. हातात लोखंडी गज घेवुन आश्रुबा गोंड यांच्या डोक्यात मारून डोके फोडत गंभीर दुखापत केली. तर अंबऋषी गोंड, नंदूबाई अंबऋषी गोंड, विद्या सुशील गोंड या तिघांनी त्यांना व त्यांच्या घरातील व्यक्तींना लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद आश्रुबा गोंड यांनी दिल्यावरून अंबऋषी गोंड, नंदूबाई गोंड, सुशील गोंड, विद्या गोंड या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version