Site icon सक्रिय न्यूज

गाडीसाठी विवाहितेचा छळ करून घराबाहेर हाकलले……! 

गाडीसाठी विवाहितेचा छळ करून घराबाहेर हाकलले……! 
 केज दि.२५ – गाडी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका ३१ वर्षीय विवाहित महिलेचा सतत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत घराबाहेर हाकलून दिल्याची घटना कानडी पिंपळगाव ( ता. गेवराई ) येथे घडली. याप्रकरणी पती, दिर व जाऊ या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
        केज तालुक्यातील गौरवाडी माहेर असलेल्या उषा बाळासाहेब वंजारे या महिलेचा विवाह कानडी पिंपळगाव ( ता. गेवराई ) येथील बाळासाहेब हरिभाऊ वंजारे यांच्याशी झालेला असून विवाहानंतर काही दिवस चांगले नांदविले. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१९ पासून पतीला गाडी घेण्यासाठी तुझ्या आई – वडीलांकडुन दोन लाख रुपये घेऊन म्हणून तगादा लावला. मात्र माहेरची तेवढी रक्कम देण्याची ऐपत नसल्याचे कारण सांगून उषा यांनी पैसे आणण्यास नकार दिला. त्यावरून पती बाळासाहेब वंजारे, दिर श्रावण वंजारे, जाऊ मुक्ता वंजारे यांनी सतत शिवीगाळ व मारहाण करून छळ केला. शेवटी पैसे घेऊन येत नसल्याने जीवे मारण्याची धमकी देऊन घरातून बाहेर हाकलून दिले. अशी फिर्याद उषा वंजारे यांनी दिल्यावरून पती बाळासाहेब वंजारे, दिर श्रावण वंजारे, जाऊ मुक्ता वंजारे या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार रमेश सानप हे पुढील तपास करत आहेत.

तू इथे राहायचे नाही, असे म्हणत महिलेस घरात घुसून मारहाण 

  प्लॉट आमचा आहे, तू इथे राहायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना तट बोरगाव ( ता. अंबाजोगाई ) येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
    तट बोरगाव ( ता. अंबाजोगाई ) येथील शुभांगी अंगद शितोळे ( वय ३५ ) ही महिला २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता घरी असताना आश्रुबा वेणूनाथ शितोळे हे घरी आले. त्यांनी हा प्लॉट आमचा आहे, तू इथे राहायचे नाही असे म्हणत घरात घुसून शिवीगाळ करीत गळ्याला धरून चापटाने मारहाण करू लागल्याने या महिलेने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर कालींदा वेणूनाथ शितोळे, सुनिता दौलत भिसे, वेणूनाथ शितोळे यांनी ही शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद शुभांगी शितोळे यांनी दिल्यावरून आश्रुबा शितोळे, कालींदा शितोळे, सुनिता भिसे, वेणूनाथ शितोळे यांच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार खेडकर हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version