केज दि. २७ – तालुक्यातील जवळबन येथील तरुण शेतकरी बाळासाहेब गोवर्धन घाडगे वय 32 वर्ष यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज, आर्थिक चणचण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्यातून खचून आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली. युसूफवडगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.