केज दि.28 – तालुक्यातील दलित चवळीतील एक जेष्ठ कार्यकर्ते गंगाधर सिरसट वय (५४ वर्ष) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
दलित चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आणि भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजनचे आघाडीचे गंगाधर सिरसट वय हे दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी घरातून निघून तहसील कार्यालयाकडे जात असताना ते रस्त्यावर येताच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.