बीड दि.29 – तहसील कार्यालया अंतर्गत दिली जाणारी विविध प्रमाणपत्रे ही आता कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडल्या शिवाय देऊ नयेत. तसेच कोणतेही अर्ज न स्विकारण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सर्व तहसील कार्यालयांना दिले आहेत.
बीड जिल्ह्यात ५२% नागरीकांनी कोव्हिड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. या लसीकरण मोहिमेला गती देऊन १००% लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानाने कठोर पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालया अंतर्गत दिली जाणारी जात प्रमाण पत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाण पत्र, उत्पन्न प्रमाण पत्र आणि इतर विविध प्रमाण लसीकरण झाल्या बाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडणे अनिवार्य करावे असा आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे आता लसीकरण केल्याचे प्रमाण पत्र सोबत असेल तरच अर्ज स्विकारला जाईल किंवा विविध प्रमाणपत्रे मिळणार असल्याने लसीकरणाला गती येण्याची अपेक्षा आहे.