केज दि.३१ – तालुक्यातील विडा परिसर सर्वात मोठी लोकसंख्या असणारा परिसर आहे. यात जवळपास 40 पेक्षा अधिक गावाचा समावेश आहे. वर्षाला जवळपास 120 प्रसूतीच टार्गेट
तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेलं आहे. हे टार्गेट मागील पाच महिन्यात विडा प्राथमिक आरोग्य केंद्राने मे ते ऑक्टोबर महिन्यात 50 प्रसूती पूर्ण करून केज तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मागील दोन वर्षांपासून विडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीच प्रमाण फार कमी होतं. कारण येथील नविन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने विडा आणि परीसरातील महिलांना प्रसूतीसाठी केज किंवा बीड इत्यादी ठिकाणी जावा लागत असे. मात्र विडा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही मे 2021ला सुरू झाली असून पुढील काळात 150 पेक्षा अधिक पासूती विडा आरोग्य केंद्रांत होतील.तसेच प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना रुग्णवाहिका आपापल्या गावात जाऊन सोडण्याचं काम करतात. यामध्ये आशा कार्यकता यांचे मोठे योगदान आहे.
दरम्यान, आगामी काळात हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जास्तीतजास्त प्रसूती विडा केंद्रात होतील व प्रसूतीसाठी विडा प्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्याच सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. अशी माहिती विडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. शिला कांबळे यांनी सक्रिय न्युज ला दिली.