केज दि.1 – मागच्या दोन दिवसांपूर्वी शहरातील शिक्षक कॉलनीत एका घरात बीड तालुक्यातील सफेपुर येथील ऊसतोड मजुराचा मृतदेह आढळून आला होता.
सदर प्रकरणी मयताची पत्नी मीरा घोडके हिच्या फिर्यादी वरून ३६ तासा नंतर केज पोलीस ठाण्यात जिवराज केशव हंगे व बाबुराव केशव हंगे यांच्या विरुद्ध गु र न ५३३/२०२१ भा दं वि ३०२, ३६५, ३४२ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.