Site icon सक्रिय न्यूज

दिवाळी सुट्ट्यां बाबत शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय……..!

दिवाळी सुट्ट्यां बाबत शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय……..!

मुंबई दि.4 – दिवाळीच्या सुट्ट्या शिक्षण विभागाच्या आधीच्या परिपत्रकाप्रमाणे कमी झाल्या असतील तर दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे देण्यात याव्यात, अशा प्रकारचे परिपत्रक शिक्षण संचालककडून काढण्यात आले आहे. 12 नोव्हेंबरला नियोजित राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळाच्या काळात किंवा मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन या सुट्यांचं समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

          यानुसार जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी त्यासोबतच सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांना स्थानिक पातळीवर शाळांना सुट्टी कधी वाढवून देण्यात येणार? याबाबत निर्णय घेतील. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या जरी 28 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान देण्यात आल्या असल्या तरी शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने या सुट्ट्या 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा झाल्यानंतर 20 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्यात येऊ शकतील. त्यामुळे या परिपत्रकानुसार दिवाळीच्या सुट्ट्या या 10 नोव्हेंबरनंतर 12 नोव्हेंबरची परीक्षा झाल्यानंतर 20 नोव्हेंबरपर्यंत मिळू शकतील. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आलेल्या इतर सरकारी कामांमुळे ज्यांच्या सुट्ट्यांवर परिणाम झालाय त्यांच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यांना या सुट्ट्या नंतर घेता येणार आहेत. दिवाळीत शाळेत यावे लागल्याने अनेक शिक्षकांच्या सुट्ट्या वाया गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर पाठवपुरावा करण्यात येत होता, त्याला यश आले आहे.
         दरम्यान, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 11वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नसल्यामुळे राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन वर्गांना पूर्वीप्रमाणे 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यास यावी अशी मागणी मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षण उपसंचालकांकडे केली असल्याचे संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी कळवले आहे.
शेअर करा
Exit mobile version