केज दि.४ – शिक्षण क्षेत्रात शिक्षिका ते विस्तार अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या रेखा भानुदास शिंदे – माने ह्या सेवानिवृत्त झाल्या. त्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा जीवन गौरव करण्यात आला.
नेकनूर येथील रेखा भानुदास शिंदे ह्या सर्वप्रथम जि. प. मा. शा. केज येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर, मस्साजोग, धारूर, तांबवा इत्यादी गावांत ज्ञानदानाचे कार्य केले. तर उमरी येथे मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्या शिक्षण विस्तार अधिकारी झाल्या. शिक्षण क्षेत्रात ३८ वर्षे प्रदीर्घ सेवा प्रामाणिकपणे पूर्ण करून विस्तार अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल केज येथे त्यांचा जीवन गौरव करण्यात आला.
सदरील कार्यक्रमासाठी माजी आमदार सुनील धांडे, युवानेते अक्षय मुंदडा, शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, युवानेते पशुपतीनाथ दांगट, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्यासह तालुक्यातील शेकडो शिक्षकांची व नागरिकांची उपस्थिती होती.