Site icon सक्रिय न्यूज

पीएम किसान योजनेचा शेवटचा हफ्ता होणार ”या” तारखेपर्यंत खात्यात जमा…….!

पीएम किसान योजनेचा शेवटचा हफ्ता होणार ”या” तारखेपर्यंत खात्यात जमा…….!

नवी दिल्ली दि.5 – पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात  6 हजार रूपये जमा करत असतं. त्यानुसार आता लवकरच पीएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करायची होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात  केंद्र सरकारकडून लवकरच शेवटचा हप्ता म्हणजे 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. मागील वर्षीच्या अंदाजानुसार यावर्षी 15 डिसेंबरपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे कमीत-कमी 2 हेक्टर लागवडीयोग्य जमीन असणं आवश्यक आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. योजनेचा याआधीचा हप्ता ऑक्टोंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

दरम्यान, पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये जमा केले जातात. आत्तापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1.58 कोटी रुपये जमा केले आहेत. विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांना कुठेही खेटा माराव्या लागत नाहीत. सरकार ऑनलाईन पद्धतीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतं.

शेअर करा
Exit mobile version