Site icon सक्रिय न्यूज

एकाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा……! 

एकाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा……! 
 केज दि.८ – दोन दुचाकींच्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावरील कडमवाडी फाट्याजवळ घडली होती. याप्रकरणी दुसऱ्या दुचाकीच्या चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
      बीड तालुक्यातील येळंबघाट येथील किरण उर्फ श्रीरंग शंकर फुलवरे ( वय २२ ) हा तरुण १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून ( एम. एच. ०३ एबी ७४२२ ) केज – मांजरसुंबा रस्त्याने जात असताना कडमवाडी फाट्याजवळ समोरून आलेल्या दुचाकीच्या ( एम. एच. १२ पीयु ५८५१ ) चालकाने दुचाकी भरधाव वेगात आणि हायगयी व निष्काळजीपणे चालवुन त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात किरण फुलवरे हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच दिवशी रात्री उशिरा उपचार सुरू असताना किरणचा मृत्यू झाला. ८ नोव्हेंबर रोजी त्याचे चुलते किसन आण्णा फुलवरे ( रा. नागझरी ता. गेवराई ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम. एच. १२ पीयु ५८५१ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार भालेराव हे पुढील तपास करत आहेत.

जुन्या भांडणावरून महिलेचे डोके फोडले 

 जुन्या भांडणाची कुरापत काढून एका ३५ वर्षीय महिलेस लाथाबुक्याने व फुकरीने बेदम मारहाण करीत काठी डोक्यात मारून डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील माळेवाडी येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
        माळेवाडी येथील उषाबाई आबासाहेब हाके ( वय ३५ ) ही महिला ७ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घरासमोर असताना राहुल रामदास हाके, अशोक रामदास हाके, बालीकाबाई रामदास हाके, बाईनी रामदास हाके ( सर्व रा. माळेवाडी ) हे संगनमत करून आले. त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत लाथाबुक्याने व फुकरीने बेदम मारहाण केली. व उषाबाई हाके यांच्या डोक्यात काठी मारून डोके फोडून जीवे मारण्याची धमकी ही दिली. अशी फिर्याद उषाबाई हाके यांनी दिल्यावरून राहुल हाके, अशोक हाके, बालीकाबाई हाके, बाईनी हाके या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार गोविंद बडे हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version