केज दि.९ – तालुक्यातील एका अंगणवाडीच्या कर्मचारी महिलेने बँकेतून कॅशिअरच्या नजरचुकीने जास्तीचे आलेले तीस हजार रु. परत करून आपला प्रमानिपणा दाखवला. त्यामुळे प्रमाणिकपणाला परिस्थिती कारणीभूत ठरू शकत नाही हे अशा कांही तुरळक गोष्टींवरून सिद्ध होते.
उर्मिला पायाळ-शिनगारे रा. कोरेगाव ता. केज या महिला व बालविकास प्रकल्पाच्या अंतर्गत कोरेगाव येथील अंगणवाडीत काम करीत आहेत. त्यांनी आपल्या बचत खात्यातील ३० हजार रु. काढण्यासाठी एसबीआय बँकेच्या केज शाखेतून पैसे काढण्याची पावती भरून दिली; पण त्यांना पैसे देताना कॅशिअर मुंडे यांनी ३० हजार रु. ऐवजी ६० हजार रु. दिले. त्यांनी घरी आल्या नंतर पैसे मोजून पाहिले असता जास्त पैसे आले असल्याने पासबुकवर नोंद पहिली. तर त्यावरही ३० हजार रु. काढल्याची नोंद होती. नंतर उर्मिला पायाळ-शिनगारे यांनी ही महिती पत्रकार गौतम बचुटे यांना दिली आणि पैसे परत करण्याची ईच्छा व्यक्त केली. त्या नंतर दि. ६ नोव्हेंबर रोजी उर्मिला पायाळ-शिनगारे यांनी गौतम बचुटे यांच्यासह बँकेत जाऊन कॅशिअर मुंडे यांना जास्तीचे आलेले पैसे परत केले.
तर ३ मार्च रोजी उर्मिला पायाळ-शिनगारे यांनी विहिरीत पडलेल्या नऊ वर्ष वयाच्या वैभव लांब या लहान मुलाला स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले होते.