केज दि.१५ – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पूर्वी पडलेले आरक्षण रद्द होऊन पुन्हा नव्याने प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले असून कांही ठिकाणी अनेकांची सोय तर अनेकांची गैरसोय झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
उपविभागीय अधिकारी शरद झाडके, नायब तहसिलदार सचिन देशपांडे, सीईओ अंधारे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी 9 व 16 वार्ड तर अनुसूचित जातींसाठी 7 वार्ड आरक्षित झाला आहे. तर ओबीसी महिलांसाठी 8 आणि 1 वार्ड सुटला असून ओबीसी पुरुषांसाठी 12 आणि 2 हे वार्ड आरक्षित झाले आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी 11,5, 4, 13,आणि 14 हे वार्ड आरक्षित झाले असून 3, 10,6, 15 आणि 17 हे वार्ड सर्वसाधारण जाहीर करण्यात आले आहेत. कांही प्रभागात पूर्वीच्या आरक्षणाप्रमाणे कामाला लागलेल्या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला असून काहींना नव्याने संधी निर्माण झाल्या आहेत. अनुसूचित जातीच्या जागा जैसे थे राहिल्या असून कांही ठिकाणी पुरुषांच्या जागेवर महिलांना संधी प्राप्त झाली आहे.
दरम्यान आरक्षण जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने आता निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.