बीड दि.20 – दिनांक -09/10/2021 रोजी ऑल अग्रीकल्चरल इंडिया स्टुडन्ट असोसिएशन तामीळनाडू यांनी आयोजित केलेल्या कॉन्फरन्स मध्ये चांगदेव भारत सानप (एम एससी कृषी- उद्यानविद्या )यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये चारोळी या फळपिकावर संशोधन करुन आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये संशोधन पेपर सादर केला. या कॉन्फरन्स मध्ये चांगदेव सानप यांना बेस्ट ओरल प्रेझेन्टेशन अवार्ड मध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे.
चांगदेव सानप हे मूळचे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तरणळी या अति दुर्गम भागातील ऊसतोडकामगार कुटुंबातील असून सध्या ते रायगड जिल्ह्यात स्वदेश फाऊंडेशन या संस्थेत वरीष्ठ समनवयक म्हणून ग्रामीण सक्षमिकणचे काम करत आहेत. या सेमिनार साठी सहायक प्राध्यापक डॉ. दीपक कुमार अहिरे व सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील पाटील कृषी महाविद्यालय नंदुरबार व धुळे यांनी मार्गदर्शन केले.