Site icon सक्रिय न्यूज

रेशनकार्ड धारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा…….!

रेशनकार्ड धारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा…….!

नवी दिल्ली दि.24 – केंद्र सरकारनं गरीब कल्याण योजना (PMGKY) आणली. या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना मोफत गहू आणि तांदूळ देण्यात येतात. या योजनेच्या कार्यकाळात वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना प्रतिव्यक्ती गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत डिसेंबरमध्ये संपणारी योजना अजून चार महिने वाढवण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. केंद्रीय कृषी कायदे मागं घेण्याच्या प्रस्तावावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. यासोबतच शेतकरी घटकांच्या फायद्यासाठी जे काही करता येणार आहे ते करण्याचा सपाटा केंद्र सरकरनं सध्या लावला आहे. याचाच एक भाग म्हणून गरीब कल्याण योजनेच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता मार्च 2022 पर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नावानं संदेश जाहीर करत केंद्रीय कृषी कायदे मागं घेत असल्याची घोषणा केली होती. परिणामी केंद्र सरकरनं आता रेशन दुकानांना मोफत धान्य वाटप चालू ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

शेअर करा
Exit mobile version