केज दि.२५ – तालुक्यातील नांदूरघाट गटात मार्च 2016 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग ,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व पंचायत समिती,रोजगार हमी योजने मार्फत झालेल्या जवळपास ८५ ते ९० करोड रुपयांच्या कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाला आहे.सदर कामाची चौकशी चौकशी समिती नेमून रस्ते,नाल्या,पूल,सिमेंट रस्ते,पथ दिव्यांच्या कामांची व इतर कामांची चौकशी करून संबंधित दोषी गुत्तेदार व शासकीय अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
नांदूरघाट, शिरूरघाट सह अनेक गावांमध्ये शासनाणे करोडो रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना निर्माण केल्या आहेत परंतु त्या चालू नाहीत ,बंद असलेल्या पाणी पुरवठ्याच्या योजना सुरळीत चालू कराव्यात.नांदूरघाट गटातील घरकुल यादी मध्ये नावे आलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे काम सुरू करण्यासाठी अडवणूक न करता पैसे वितरित करावे व ज्या घरकुल लाभार्थ्यांचे काम पूर्ण झाले आहे त्यांचा शेवटचा हप्ता वितरित करावा.नांदुर घाट ग्रामपंचायत मध्ये तेरा चौदा वित्त आयोगा मार्फत 2016 ते 2021 पर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी.नाहोली ते दैठणा रस्ता एक वर्षे झाले मंजूर असून गुत्तेदारा मार्फत काम पूर्ण करण्यात आले नाही संबंधित गुत्तेदारावर दंड लावून रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे.नांदूरघाट येथील बौद्ध समाज,कुंभार समाज,कोष्टी समाज,वाणी समाज यांच्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमीच्या निर्मिती कराव्या.केज – नांदूरघाट – चौसाळा मार्गावर नांदूरघाट अंतर्गत मंजूर असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यरंभ आदेश देऊन तीन वर्षे झाली आहेत परंतु ते काम आज पर्यंत पूर्ण नाही,रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने संबंधित गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे.शिरूर(बारव पांद) ते वांजरा रस्ता,शिरुर घाट(आव्हाड वस्ती ते वांजरा ,एकुरका – धोत्रा – हंगेवाडी रस्ता, बेलगाव ते माळेवाडी रस्ता,गदळेवाडी ते गदळे वस्ती रस्ता,मुंडेवाडी ते खरमाटा, मुंडेवाडी ते सारणी या रस्त्याना जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कृती आराखड्यात घेऊन संबंधीत रस्त्यांना इतर जिल्हा मार्गाचा क्रमांक द्यावा.खाडेवाडी व खोमणेवाडी या गावाची मतदार संख्या प्रत्येकी ४०० च्या वर आहे या गावातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पाच ते सहा किलो मिटर नांदूरघाट च्या मतदान केंद्रावर जावे लागते,खाडेवाडी व खोमणेवाडी या गावांना त्यांच्या गावातच स्वतंत्र मतदान केंद्र द्यावेत.शिरूरघाट येथे तीन वर्षे झाले रखडलेल्या पाणी पूरवठा योजने मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे,पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेले पाईप शासनाच्या नियमांत बसत नाहीत,पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण नाही शिरूरघाट येथील पाणी पुरवठ्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी.शिरूरघाट येथील अंगणवाडी क्र १ मध्ये रस्त्यावरील नालीचे दूषित पाणी अंगणवाडी मध्ये पसरत आहे,अंगणवाडी ची इमारत कमकुवत झाली आहे,संबंधित अंगणवाडी चे नूतनीकरण करण्यात यावे या मागण्यांसाठी मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस हे केज तहसील कार्यालया समोर सोमवार दिनांक २९ निव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
नांदूरघाट सर्कल मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी व नागरिकांच्या अनेक महत्वपूर्ण विषयांसाठी मनसे मार्फ़त सुमंत धस यांच्या अन्नत्याग आंदोलनात सहभागागी व्हावे अशे आव्हान मनसे चे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,शेतकरी सेना तालुका अध्यक्ष बाबुराव ढाकणे,गुणवंत सांगळे,विक्रम सांगळे,गोविंद हाके,संतोष शिनगारे,वामन बिक्कड,स्वप्नील मगरे,योगेश गायकवाड,संजय त्रिमुखे, सर्जेराव जाधव,अंकुश ठोंबरे,विक्रम भांगे,रामा तांबडे,राजेश तांबडे,विजय हंगे,भगवान चौरे,राज घोळवे,आबा घोळवे,यांनी केले आहे.