Site icon सक्रिय न्यूज

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी……!

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी……!

नवी दिल्ली दि.28 –  मागील काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असताना शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तर दुसरीकडे खतांच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी अडचणी आल्या होत्या. अशातच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

रब्बी हंगामात युरियाच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. तर पुरवढ्यामध्ये घट झाल्याचं देखील दिसून आलं होतं. अशातच केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.देशातील अनेक राज्यांमधून खताची कमतरता असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. एप्रिल ते जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत चीनकडून 10 लाख टन युरिया आयात करण्यात आला होता. आता तो अंतर्गत बाजारपेठेत पाढवला जाणार आहे.

दरम्यान, एकूण खतांच्या वापरांपैकी युरियाचा सर्वात जास्त वापर केला जातो. युरियाचा वापर हा तब्बल 55 टक्के इतका आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मागणी वाढल्यामुळे खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शेअर करा
Exit mobile version