Site icon सक्रिय न्यूज

केज पोलीस गस्तीपथकाची मोठी कारवाई……!

केज पोलीस गस्तीपथकाची मोठी कारवाई……!
केज दि.२८ –  केज पोलिसांच्या गस्ती पथकाने एका संशयास्पदरीत्या माल वाहतूक करीत असलेल्या वाहनाचा पाठलाग करून नाकाबंदी करीत टेम्पो ताब्यात घेतला असता त्यात गोवंशीय मांस असल्याचे आढळून आले. या प्रकरणी दोघासह वाहन ताब्यात घेतले आहे.
                   दि. २७ नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री ११:०० च्या दरम्यान केज पोलिसांना अशी माहिती मिळाली की, केज कडुन एक विटकरी रंगाचा आयशर टेम्पो क्र.(एमएच-१७/बीडी-४८७६) सोयाबीन चोरुन घेवुन जात आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्ष वाघमोडे यांना मिळताच त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे याना कार्यवाहीची सूचना दिल्या. त्या प्रमाणे सपोनि संतोष मिसळे यांनी गस्ती पथकाचे कर्मचारी मंगेश भोले, कांबळे आणि गायकवाड यांना सदर आयशर टेम्पो क्र .(एमएच-१७/बीडी-४८७६) याचा केज-कळंब रोडवरील चिंचोली पाटी पासून पाठलाग केला. पोलिसांची गाडी पाहताच वाहन चालकाने साळेगाव पासून पुढे माळेगाव येथील शिवाजी चौकातून वाहन अंबागाईकडे जाणाऱ्या रस्त्याने  युसुफवडगावच्या दिशेने भरधाव वेगाने पळविले. त्या नंतर पोलीस पथकाने युसुफवडगाव पोलीस स्टेशनला कल्पना देऊन संशयित वाहन नाकाबंदी करून ताब्यात घेण्याचे कळविले. त्या नुसार यूसूफवडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांनी सपोनि विजय आटोळे यांना माहिती देताच सपोनि विजय आटोळे आणि खनपटे, मेहेत्रे व समुद्रे यांनी नाकाबंदी करून ते वाहन गोटेगाव येथील केजडी नदीच्या पुलावर तो टेम्पो अडवून ताब्यात घेतला. सदर वाहन युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात आणून त्याचा ड्रायव्हर शारुख युदुफ खान (रा. मुकुंद नगर, अहमदनगर) व त्याचा साथीदार मंजूर मोहम्मद शेख (रा. आरणगाव ता. जामखेड जि. अहमदनगर) यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या वाहनात पाळीव प्राणी व गोवंशाचे मांस असल्याचे आढळून आले.
              दरम्यान, पोलीस जमादार वाघचौरे यांच्या फिर्यादी वरून शारुख युदुफ खान (रा. मुकुंद नगर, अहमदनगर) व त्याचा साथीदार मंजूर मोहम्मद शेख (रा. आरणगाव ता. जामखेड जि. अहमदनगर) यांच्या विरुद्ध गु र नं १९४/२०२१ भा. दं. वि. ४२९ आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षक  (सुधारणा) कायदा ५ (अ), ५ (ब), ५ (क), ५ (ड), ९ (अ) आणि ९( ब) नुसार गुन्हा दाखल आला आहे.या प्रकरणी दोन्ही आरोपीना दि. २९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय आटोळे हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version