Site icon सक्रिय न्यूज

अपहरण करून दोन वर्षाच्या मुलीला कोंडले होते कपाटात

अपहरण करून दोन वर्षाच्या मुलीला कोंडले होते कपाटात

औरंगाबाद दि.२९ – दोन वर्षाच्या मुलीला मारहाण करत लाकडी कपाटात कोंडण्याची धक्कादायक घटना शहरात शनिवारी रात्री घडली. दलालवाडीतील या संतापजनक प्रकारानंतर नागरिकांनी संबंधित आरोपीला चांगलाच चोप दिला होता. शशिकांत दिलीप भदाणे असे या विकृताचे नाव असून या प्रकरणी क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने विकृत आरोपीला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याच आदेश दिले आहेत.

दलालवाडी परिसरात शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका कुटुंबातील दोन वर्षाची चिमुकली बेपत्ता झाली होती. तसेच दलालवाडीतील याच परिसरात नुकताच भाड्याने राहण्यासाठी आलेल्या आरोपीच्या घरातून नागरिकांना लहान मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. दरवाजा बाहेरून बंद होता. स्थानिकांनी तत्काळ दरवाजा तोडून पाहिल्यास कपाटात ती मुलगी आढली. मुलीच्या नाकातून रक्त येत होते. नागरिकांनी तत्काळ तिच्यावर प्राथमिक उपचार करून क्रांती चौक पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान आरोपी बाजूच्याच परिसरात फिरत असल्याचे नागरिकांच्या दृष्टीस पडले तेव्हा लोकांनी त्यालाही चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या तावडीत दिले.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांतने 2008 मध्ये एमआयडीसी वाळूज परिसरातील एका पंधरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार केला होता. त्यात न्यायालयाने शिक्षादेखील ठोठावली. तेव्हापासून तो हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होता. कोरोना काळात पॅरोलवर सुटल्यानंतर त्याने निराला बाजार येथील हॉटेलमध्ये काम सुरु केले होते. दलालवाडीत त्याला भाड्याने घर देताना किंवा हॉटेलमालकाने नोकरी देताना त्याला कुठलीच माहिती विचारण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याची पुन्हा एकदा विकृत प्रकार करण्याची हिंमत झाली.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version