बीड दि.29 – तालुक्यातील लिंबागणेश येथे मांजरसुंबा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ गाडी अति वेगात असताना रस्त्याच्या खाली उतरून तिचा अपघात झाल्याने त्यातील एक व्यक्ती जागीच ठार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सदर घटना आज सायंकाळी ०६:०० च्या दरम्यान घडल्याची माहिती मिळत आहे. पांढऱ्या कलरची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच.२० बी.वाय १८४१ ही अतिवेगात असताना राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश जवळ अपघात झाला असून यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर तीन गंभीर जखमी झाले असून त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.घटनास्थळी स्थानिक च्या नागरिकांनी तात्काळ पोहोचून अपघातग्रस्तांना मदत केली.