Site icon सक्रिय न्यूज

मी अभ्यास करून माहिती देत आहे, कुणीही घाबरून जाऊ नये……!

मी अभ्यास करून माहिती देत आहे, कुणीही घाबरून जाऊ नये……!

मुंबई दि.29 – देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आपल्या देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार डेंजर आहे हे सिद्धही झालं नाही. मी अभ्यास करून माहिती देत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही.

शेअर करा
Exit mobile version