दरम्यान, ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ (Beto Bachao, Beti Padhao Yojana) या योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्ही रोज 416 रुपयांची बचत केली तर तुमच्या मुलीसाठी अखेरला 65 लाख रुपये जमा होऊ शकतील. मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत हे अकाउंट खुलं राहतं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या 2 मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खातं उघडता येऊ शकतं.
मुलगी अठरा वर्षांची होताच मिळतील 65 लाख……!
मुंबई दि.2 – केंद्र सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. मुलींना शिक्षण घेता यावे. त्यामध्ये त्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत. मुलींना शिकून स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘सुकन्या समृद्धी योजना’ (Sukanya Samruddhi Yojana) या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैशांची गुंतवणूक करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिस (Indian Post Office Yojana) किंवा कोणत्याही बँकेच्या अधिकृत शाखेत खातं उघडावं लागतं. मुलीचा जन्म झाल्यानंतर 10 वर्षाच्या आत तुम्ही हे अकाउंट उघडू शकता. 250 रुपये भरूनसुद्धा तुम्हाला हे अकाऊंट उघडता येईल. या योजनेत गुंतवणूक करून 9 वर्षे 4 महिन्याच्या कालावधीत खात्यातील पैसै दुप्पट होतात. (Money Double Scheme) या योजनेअंतर्गत तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये खात्यात जमा करू शकता. शिवाय या योजनेमध्ये दर वर्षाला 7.6 टक्के व्याज तुम्हाला मिळू शकतं. विशेष म्हणजे मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर ती स्वत:देखील अकाउंटमधून पैसे काढू शकते. त्यामुळे मुलीच्या भविष्याची सोय म्हणून ही एक उत्तम योजना आहे.